रेशन कार्डधारकांच्या समस्या वर त्वरित तोडगा काढावा यासाठी मा.उपसरपंच शितल खोत व श्री बाबासाहेब चौगुले यांच्याकडून तहसीलदार यांना निवेदन
रेशन दुकान हा ग्रामीण भागाचा एक अविभाज्य घटक आहे मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्यांसाठी रेशन कार्ड दुकान एक अविभाज्य घटक असून गेले काही दिवसापासून या रेशन दुकानांमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत त्या समस्या वर त्वरित तोडगा काढावा रेशन धान्य हे पूर्ववतप्रमाणे द्यावे रेशन कार्ड मधील नावे वाढवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर व्हावा व ही पद्धत सोपी व्हावी यासाठी हे निवेदन देण्यात आले निवेदनाचा विचार न केल्यास पंधरा दिवसात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
ही निवेदन तहसीलदार हातकलंगले कल्पना ढवळ मॅडम तसेच पोलीस स्टेशन हातकलंगले संबंधित विभागाचे पुरवठा अधिकारी संजय पुजारी साहेब तसेच सरपंच सौ राजश्री संतोष रूकडीकर गाव कामगार तलाठी श्री सोळाअंकुरे साहेब गाव कामगार पोलीस पाटील सौ कविता कांबळे मॅडम यांनाही निवेदन देण्यात आले
निवेदन देण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष रूकडीकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजकुमार मोहिते, सत्यजित इंगळे, संजू कांबळे आणि भागातील सर्व नागरिक उपस्थित होते

