शिंदे गट आणि भाजप भिडण्याची शक्यता, हे आहे कारण


नाशिक : राज्यामध्ये सध्या शिंदे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार सुरू आहे. मात्र, सगळं काही आलबेल असल्याचे सांगितले किंवा दाखविले जात असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात सगळं काही आलबेल नाहीये अशी चर्चा आहे. त्यातच पालकमंत्र्यांच्या नावाच्या घोषणा करतांना शिंदे यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचेच नाव असेल अशी चर्चा असतांना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यातच नुकतीच दादा भुसे यांनी नाशिक महानगर पालिकेत (NMC) आढावा बैठकी दरम्यान भाजपने केलेली घरपट्टीची करवाढ रद्द करणार असल्याची लेखी आश्वासनात म्हंटल आहे. त्यामुळे भाजपवर ही कुरघोडी केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.नाशिक : राज्यामध्ये सध्या शिंदे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार सुरू आहे. मात्र, सगळं काही आलबेल असल्याचे सांगितले किंवा दाखविले जात असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात सगळं काही आलबेल नाहीये अशी चर्चा आहे. त्यातच पालकमंत्र्यांच्या नावाच्या घोषणा करतांना शिंदे यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचेच नाव असेल अशी चर्चा असतांना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यातच नुकतीच दादा भुसे यांनी नाशिक महानगर पालिकेत (NMC) आढावा बैठकी दरम्यान भाजपने केलेली घरपट्टीची करवाढ रद्द करणार असल्याची लेखी आश्वासनात म्हंटल आहे. त्यामुळे भाजपवर ही कुरघोडी केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.