एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अधिकारी काम करताय ? कुणी केला आरोप


 

 होती मात्र तो वेडसर असल्याचे समोर आल्यानंतर त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. तर यंदा झेंडूची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे त्याचे नुकसान झाल्याने पुरवठय़ावर परिणाम होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारण्याची शक्यता आहे.

याशिवाय शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरूनही राजकीय वर्तुळात रोज नेतेमंडळींची नवनवीन विधानं समोर येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय राज्यभरातील अन्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व सर्वच क्षेत्रांमधील घडामोडी वाचा फक्त एकाच क्लिकवर.

चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नाशिकच्या शिवसेना (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी एका आरटीओ (RTO) अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. थेट रेकॉर्डिंग असल्याचा दावा करत अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्याला एका आरटीओ अधिकाऱ्याने फोन करून बसेस देण्याची मागणी केली आहे. त्यात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम करत असल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. इतकंच काय तर शासन कोणतेही असो, प्रशासनाने त्यांचे काम केले पाहिजे. दसरा मेळाव्याकरिता बसेसची मागणी अधिकारी करीत असेल तर हे चुकीचे आहे. त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे अशी मागणी नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगूजर यांनी केली आहे.